इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पाटण फूड फेस्टिवल २०२३ उत्सहात साजरा
कोयना एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण ची स्थापना एप्रिल २०२२ रोजी झाली.आज कॉलेज ला महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ , मुंबई बोर्डाची मान्यता असून कॉलेज अंतर्गत हॉटेल मॅनेजमेंटचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात.
हॉटेल मॅनेजमेंट म्हंटले कि विद्यार्थ्यांना संपूर्ण हॉटेल व्यवस्थापन कसे असते ?याचा अभ्यास घेतला जातो . या मध्ये विद्यार्थ्यांना कूकिंग , बेकिंग , सर्विस , रूमचे व्यवस्थापन , गेस्टचे आदरातिथ्य या गोष्टी शिकवल्या जातात. व हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना विविध उपक्रमास सामोरे जावं लागते , त्यापैकी एक म्हणजे फूड फेस्टिवल . फूड फेस्टिवल सादर करण्यामागचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांचे कलागुण , त्यांचे मार्केटिंग कौशल्य , त्यांना भेटणारा कूकिंगचा , सर्विसचा अनुभव जो त्यांना पुढे करियर घडवताना अतिशय मौल्यवान ठरत असतो .हा फूड फेस्टिवल म्हणजे काय तर थोडक्यात आलेल्या पाहुण्यांसाठी पदार्थाची रेलचेल. मग या पूर्ण फूड फेस्टिव्हलची तयारी विद्यार्थी स्वतः करत असतात . याच अनुषंगाने इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण ने यावर्षी ” अतुल्य भारत” (“Incredible India “ )या थिम वर फूड फेस्टिवल करण्याचे आयोजन केले होते . हा फूड फेस्टिवल येत्या २७ डिसेंबर २०२३ रोजी कॉलेजच्या संकुलनात मोठ्या उत्सहात संप्पन झाला.
या फूड फेस्टिवल चे उदघाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्रीमंत . अमरसिंह पाटणकर , जॉईंट सेक्रेटरी डॉ. सुहास देशमुख , संचालक श्रीमंत . याज्ञसेन पाटणकर , संचालक श्री संजीव चव्हाण यांनी केले . अशा फूड फेस्टिवल चे आयोजन पाटण नगरवासियांसाठी अतिशय नवखा होता त्यामुळे आलेल्या प्रत्येक अतिथी मध्ये एक वेगळीच कुतूहलता पाहावयास मिळाली . या फूड फेस्टिवल मध्ये आपल्या भारत देशातील राज्यातील नावीन्य असणाऱ्या पदार्थांची रेलचेल पाहावयास मिळाली. जसे कि महाराष्ट्रीयन , केरळ , काश्मिरी , पंजाबी , हैद्राबादी , असामी , गुजराती , राजस्थानी इत्यादी. हा संपूर्ण फूड फेस्टिवल चे आयोजन हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले. पाटण शहरातील नामवंत व्यावसायिकांनी या उपक्रमास आपला प्रतिसाद विद्यार्थ्यांना स्पॉन्सरशिप स्वरूपात दर्शविला ; हॉटेल सुस्वाद, अंबिका ज्वेलर्स , मॉडर्न कॉम्प्युटर्स , मॉन्जिनीस , रुबाब मेन्स वेअर , हॉटेल आकाश पॅलेस उंब्रज , एस . आर . इलेकट्रीकल्स आणि अशा बऱ्याच व्यावसायिकांनी विद्यार्थ्यांना प्रोसाहित केले .
पदार्थांच्या रेलचेल बरोबरच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते जसे कि कोयना कला अकॅडमीच्या विद्यार्थिनीचा डान्स , महाराष्ट्रीयन संस्कृतीतील वासुदेव ,लहान मुलांसाठी सान्तक्लाझ , तरुणाईसाठी सेल्फीपॉईंट, मनोरंजनात्मक फनी गेम्स इत्यादी . विद्यार्थ्यांनी देखील भारत देशातील विविध राज्यातील पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. पाटणकर वासियांसाठी हा नवीन अनुभव असल्याने त्यांनी देखील विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले केले .
आदरणीय श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर , युवा नेते श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या . कॉलेज चे प्राचार्य श्री. चेतन सावंत , प्रा . श्री.अमोल चव्हाण , प्रा . श्री.समीर सपकाळ , प्रा .
श्री.भरत कांबळे, क्लार्क श्री शिवाजी पवार तसेच इतर शिकेत्तर कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.