9.00 am to 5.00 pm
INSTITUTE OF HOTEL MANAGEMENT, PATAN News and Events इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण मध्ये फूड कॉम्पिटिशन चे आयोजन

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण मध्ये फूड कॉम्पिटिशन चे आयोजन

कोयना एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण मध्ये विद्यार्थ्यांमध्ये कूकिंग विषयी आवड निर्माण ह्यावी या साठी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी “स्टार्टर फूड कॉम्पिटिशन ” चे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे कॉलेज चालू झाले असून नवीन विद्यार्थ्यांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय आणि या नवीन कोर्स मध्ये कशाप्रकारे शिक्षण दिले जाते याची कल्पना यावी यासाठी या कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्षातील नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांनी या मध्ये उस्फुर्तपाने सहभाग घेतला होता. या मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट अश्या व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर डिशेश बनविल्या होत्या . अगदी पावसाळ्यात सर्वाना खाऊ वाटणारी कांडा भजी पासून ते चिकन होत सिझलर अश्या स्टार्टरची रेलचेल पाहण्यास आली. कॉलेज मधून प्रत्येक महिन्यात अश्या नवं  नवीन कल्पनात्मक फूड कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात येत असते.

कोयना एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , पाटण हे सातारा जिल्ह्यातील प्रथम ISO (९००१ : २०१५) मानांकित कॉलेज असून कॉलेज अंतर्गत प्रशस्त कॉलेज कॅम्पस , मुला व मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल , डिजिटल क्लास रूम , ट्रेनिंग किचन व बेकरी, ट्रेनिंग रेस्टॉरंट आणि बार , रिसेप्शन , बँकवेट हॉल , हॉउसकीपींग रूम . कॉलेज अंतर्गत महाराष्ट्र शासन मानांकित सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस चालविले जातात. कोर्स पूर्ण झाल्यानंतर कॉलेज मार्फत ट्रेनिंग व जॉब प्लेसमेंटची १०० % हमी दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्यात आलेली असल्याची माहिती कॉलेज चे प्राचार्य श्री. चेतन सावंत  दिली

Related Post

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनॅजमेन्ट , पाटण मधील विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे ५ स्टार हॉटेल मध्ये निवडइन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनॅजमेन्ट , पाटण मधील विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे ५ स्टार हॉटेल मध्ये निवड

  कोयना एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ,पाटण मध्ये पुण्यातील “कोर्टयार्ड मरीयेट” या ५ स्टार हॉटेलचे कॅम्पस ईंटरव्हिव पार पडले असून यातून कॉलेजच्या १२ विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चा उदघाटन कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्नइन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चा उदघाटन कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न

पाटणसारख्या ग्रामीण भागात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कोयना एज्युकेशन संस्थेने उभारून येथील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज मुळे रोजगाराच्या संधी मिळतील.