Placement


इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ,पाटण विद्यार्थ्यांची कॅम्पस ईंटरव्हिव मधून ५ स्टार हॉटेल मध्ये निवड

कोयना एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ,पाटण मध्ये पुण्यातील “कोर्टयार्ड मरीयेट” या ५ स्टार हॉटेलचे कॅम्पस ईंटरव्हिव पार पडले असून यातून कॉलेजच्या १२ विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी निवड करण्यात अली आहे तसेच लेमन ट्री हॉटेल हिंजेवाडी पुणे  मध्ये २ विदयार्थ्यांची निवड झाली आहे. 

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधून १० वी , १२ वी तसेच पदवी नंतर डिप्लोमा , सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व जॉब प्लेसमेंट उपलब्ध करून देण्याची सुवर्णसंधी कॉलेजमार्फत करून देण्यात येते. आज कॉलेज मध्ये सातारा जिल्यातील विविध भागांमधून येऊन विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची स्थापना २०२२ साली झाली असून कॉलेजचे हे प्रथमच वर्ष असून अल्पावधीतच हे उत्तुंग यश संपादन केले आहे. इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे सातारा जिल्यातील प्रथम ISO (९००१:२००५) मानांकित कॉलेज असून कॉलेजमध्ये सुसज्ज क्लासरूम्स , डिजिटल मल्टिमीडिया रूम , ट्रेनिंग किचन , रेस्टॉरंट , बँक्वेट हॉल , फ्रंट ऑफिस , हॉउसकीपींग रूम , ऑडीटोरिअम हॉल , लायब्ररी , कॉम्पुटर लॅब , मुले व मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल , उच्च अनुभवी शिक्षक वर्ग अशा सर्व सोयींनी परिपूर्ण सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व पालकांची अल्पावधीत पसंतीस आलेले हे एकमेव कॉलेज आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्रीमंत याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण तसेच जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर , अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण यांनी केले. हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य चेतन सावंत , प्रा. अमोल चव्हाण , प्रा. समीर सपकाळ , प्रा. भरत कांबळे आणि शिक्षकेत्तर वर्ग यांची विदयार्थ्यांच्या यशासाठी बहुमोल मदत मिळाली. सर्व स्तरातून या यशाबद्दल विद्यार्थी व कॉलेजचे अभिनंदन होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून इच्छुक पालक व विद्यार्थी यांनी इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , पाटण या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य चेतन सावंत यांनी केले आहे.

Our Recruiters