International Placement

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , पाटण च्या विद्यार्थ्यांची दुबई येथे निवड

कु . अभिषेक आंधळे याचा सत्कार करताना श्रीमंत . अमरसिंह पाटणकर , श्री. संजीव चव्हाण , प्राचार्य .चेतन सावंत , प्रा. भारत कांबळे , श्री .शिवाजी पवार

कोयना एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट पाटण च्या विद्यार्थी कु.अभिषेक आंधळे  याची दुबई मधील  लापिता पार्क अँड रिसॉर्ट या हॉटेल मध्ये निवड झाली .कॉलेज चे उत्तम शिक्षण व विद्यार्थांची मेहनत ह्याची सांगड घालत याची  पंचतारांकित हॉटेल मध्ये निवड झाली. कु.अभिषेक आंधळे याने कॉलेज मधून हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण करून त्यानंतर कॉलेज मार्फतच झालेल्या प्लेसमेंट मधून  कोर्टयार्ड बाय मॅरीयॉट  या हॉटेल मध्ये आपले ट्रेनिंग पूर्ण केले होते, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची याच हॉटेल मध्ये हाऊसकीपींग डिपार्टमेंट मध्ये जॉब साठी निवड झाली. एक वर्ष कामाचा चांगला अनुभव घेत अभिषेक ने  परदेशात जाण्यासाठी तयारी चालू केली; शेवटी त्याच्या स्वतःच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि त्याची मुलाखतीतून निवड झाली. अभिषेक हा  सांगली मधील विद्यार्थी हलाखीत शिक्षणासाठी पाटण मध्ये राहून कॉलेज मधून उत्तम शिक्षण घेऊन आज या यशापर्यंत पोहचू शकला.

आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना देशात व परदेशात उत्तम नोकरी ची संधी प्राप्त व्हावी ह्या साठी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कायम कार्यरत असते. इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधून १० वी १२ वी तसेच पदवी नंतर डिप्लोमा , सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते . कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग  व जॉब प्लेसमेंट हे कॉलेज मार्फतच दिले जाते. देशात व परदेशात ट्रेनिंग व जॉब प्लेसमेंट उपलब्ध करून देण्याची सुवर्ण संधी कॉलेज मार्फत करून देण्यात येते.आज कॉलेज मध्ये सातारा जिल्ह्यातील विविध भागांमधून येऊन विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे सातारा जिल्ह्यातील प्रथम ISO (९००१ :२००५) मानांकित कॉलेज असून कॉलेज मध्ये सुसज्य क्लास रूम्स , डिजिटल मल्टिमिडीया रूम, ट्रेनिंग  किचन , रेस्टॉरंट , बँक्वेट हॉल , फ्रंट ऑफिस ,हाऊसकीपींग रूम,ऑडिटोरिअम हॉल ,लायब्ररी ,कॉम्पुटर लॅब, मुले व मुली साठी स्वतंत्र हॉस्टेल ,उच्च अनुभवी शिक्षक वर्ग अशा सर्व सोयीनी परिपूर्ण सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व पालकांची अल्पावधीत पसंतीस आलेले हे एकमेव कॉलेज आहे .

कु.अभिषेक आंधळे च्या  यशाचे कौतुक कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्रीमंत याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण तसेच जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर, अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण यांनी केले . हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य.चेतन सावंत , प्रा. अमोल चव्हाण , प्रा. समीर सपकाळ , प्रा. भारत कांबळे आणि शिक्षकेतर वर्ग यांची त्याच्या या यशासाठी बहुमोल मदत मिळाली. सर्व स्तरातून या यशाबद्दल विद्यार्थी व कॉलेजचे अभिनंदन होत आहे.

इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट, पाटण च्या विद्यार्थ्यांची परदेशात निवड

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देत रोजगाराची संधी निर्माण करणारे पाटण तालुक्यातील शिक्षणाचे एकमेव दालन कोयना एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट पाटण. कॉलेज चे उत्तम शिक्षण व विद्यार्थांची मेहनत ह्याची सांगड घालत इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण चा विद्यार्थी कु.रोहित जाधव ह्याची बेहरींन ( Bahrain) ह्या देशातील ऐस प्लाझा( Hotel S Plaza )  ह्या पंचतारांकित हॉटेल मध्ये निवड झाली. कु. रोहित जाधव याने कॉलेज मधून हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण करून त्यानंतर कॉलेज मार्फतच झालेल्या प्लेसमेंट मधून विवांता ताज या हॉटेल मध्ये आपले ट्रेनिंग पूर्ण केले होते, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची परदेशात जाण्यासाठी तयारी चालू करण्यात आली आणि शेवटी त्याच्या स्वतःच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि त्याची मुलाखतीतून निवड झाली.

 

 आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना देशात व परदेशात उत्तम नोकरी ची संधी प्राप्त व्हावी ह्या साठी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कायम कार्यरत असते. इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधून १० वी १२ वी तसेच पदवी नंतर डिप्लोमा , सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते . कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग  व जॉब प्लेसमेंट हे कॉलेज मार्फतच दिले जाते. देशात व परदेशात ट्रेनिंग व जॉब प्लेसमेंट उपलब्ध करून देण्याची सुवर्ण संधी कॉलेज मार्फत करून देण्यात येते. आज कॉलेज मध्ये सातारा जिल्ह्यातील विविध भागांमधून येऊन विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे सातारा जिल्ह्यातील प्रथम ISO (९००१ :२००५) मानांकित कॉलेज असून कॉलेज मध्ये सुसज्य क्लास रूम्स , डिजिटल मल्टिमिडीया रूम, ट्रेनिंग  किचन , रेस्टॉरंट , बँक्वेट हॉल , फ्रंट ऑफिस ,हाऊसकीपींग रूम,ऑडिटोरिअम हॉल ,लायब्ररी ,कॉम्पुटर लॅब, मुले व मुली साठी स्वतंत्र हॉस्टेल ,उच्च अनुभवी शिक्षक वर्ग अशा सर्व सोयीनी परिपूर्ण सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व पालकांची अल्पावधीत पसंतीस आलेले हे एकमेव कॉलेज आहे .

 

कु.रोहित जाधव च्या  यशाचे कौतुक कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्रीमंत याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण तसेच जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर, अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण यांनी केले . हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य . चेतन सावंत , प्रा. अमोल चव्हाण , प्रा. समीर सपकाळ , प्रा. भरत कांबळे आणि शिक्षकेतर वर्ग यांची त्याच्या या यशासाठी बहुमोल मदत मिळाली. सर्व स्तरातून या यशाबद्दल विद्यार्थी व कॉलेजचे अभिनंदन होत आहे.